मुंबई – ‘मेहंदी’ आणि ‘फरेब’ यासारख्या चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणारा अभिनेता फराज खान याचे आज निधन झाले . फराज बऱ्याच महिन्यांपासून आजारी होता. बंगळुरुच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. फराज गेल्या काही काळापासून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर या आजाराशी झुंज देत होता. अभिनेत्री पूजा भट्ट हिने ट्विटरद्वारे फराज खानच्या मृत्यूची दुखःद बातमी चाहत्यांना दिली आहे.
पूजा भट्टने आपले दुःख व्यक्त करत ट्विट केले आहे कि, ‘दु: खी मनाने, मी आपणा सर्वांना एक वाईट बातमी देत आहे की, फराज खानने हे जग सोडले आहे. आपण केलेल्या सर्व मदतीसाठी आणि त्याच्यासाठी केलेल्या प्रर्थानांबद्दल धन्यवाद. जेव्हा त्याच्या कुटुंबाला मदतीची सर्वात जास्त गरज होती तेव्हा, आपण सगळे मदत करण्यासाठी पुढे आलात. आता त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. फराजच्या जाण्याने मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे’.
ब्रेन इन्फेक्शन आणि न्युमोनियाशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळे त्याच्या उपचारात खंड पडला होता. अभिनेत्री पूजा भट्टनी या संदर्भात ट्विट करत, फराजच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. फराज खानच्या कुटुंबाने त्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. पूजा भट्टनेही पोस्ट करत मदतीची मागणी केली होती. यावेळी त्याच्या अनेक चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. फराज खानच्या कुटुंबाने त्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. पूजा भट्टनेही पोस्ट करत मदतीची मागणी केली होती. ज्यानंतर सलमान खानने कुठलाही गाजावाजा न करता रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरले होते.
फराज आणि त्याच्या उपचारांच्या बिलाची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. ‘फरेब’ आणि ‘गेम’सारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता फराज खानची स्थिती सध्या नाजूक आहे. सलमान खान त्याच्या मदतीसाठी धावून आला आहे. तो नेहमीच सगळ्यांची मदत करतो. मी त्याची खूप मोठी चाहती आहे आणि कायम राहीन. जर यामुळे तुम्ही माझा राग करणार असाल तर, तुमच्याकडे अनफॉलोचा पर्याय आहे. सलमान या इंडस्ट्रीतला सगळ्यात सच्चा माणूस आहे’, असे कश्मीराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती.