जळगाव – शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव आणि प्रथम एजुकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “शाळेबाहेरची शाळा ” हा कार्यक्रम आठवड्यातून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दिनांक ५ नोव्हेबर २०२० गुरुवार पासुन जळगाव आकाशवाणी केंद्रावरून वरून सकाळी साडेदहावाजता प्रसारित होणार आहे.
“शाळेबाहेरची शाळा” हा उपक्रम प्राथमिक शाळेमधील पहिली ते आठवी च्या सर्व विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. शिक्षण विभागातील यंत्रणेच्या मदतीने सर्व शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहचविणे अपेक्षित आहे.
आठवड्यातील सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार रोजी अभ्यास दिला जाईल आणि आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार रोजी दिलेल्या अभ्यासावर आधारित रेडिओ कार्यक्रम सकाळी साडे दहा वाजता जळगाव आकाशवाणीच्या ९६३ khz या जळगाव केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे.
सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम ऐकवा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉ बी एन पाटील, शिक्षण सभापती श्री रविंद्र पाटील, शिक्षणाधिकारी श्री बी एस अकलाडे यांनी संयुक्तपणे केले आहे.
शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, विजय पवार, राजेंद्र सपकाळे, विस्तार अधिकारी सरला पाटील, साकिब शेख परिश्रम घेत आहेत.