भुसावळ – शहरात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणावर दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी चाकू हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वैभव राजू महाजन (वय-१९) रा. खेडी हा गॅरेज मेकॅनिकचे काम करतो. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी जात असतांना शहरातील कालिंका माता मंदीराजवळ दोन दुचाकींवर येवून अज्ञात हल्लेखोरांनी येवून चाकूहल्ला केला. यात वैभव मोठ्याप्रमाणावर जखमी झाला.
घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, स.पो.नि. मंगेश घोटला, स.पो.नि. अनिल मोरे, पो.ना. समाधान पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, सुभाष साबळे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.