Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

by Divya Jalgaon Team
November 11, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिरसोली रोड परिसरातील एका ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शहरातील नेहरू नगरातील ४० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जतीन जयप्रकाश चांगरे (वय-४०) रा. सेंट टेरेसा शाळेसमोर, नेहरू नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, जतीन चांगरे हे पत्नी व दोन मुलांसह नेहरू नगरात वास्तव्याला आहे. ते जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वार्ड बॉय .म्हणून नोकरीला आहे.

दिवाळी निमित्त त्याची पत्नी व दोन्ही मुले माहरी मनमाड जि.नाशिक येथे गेल्या होत्या. तर वडील जयप्रकाश मनिराम चांगरे हे रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ते शहरातील नवल कॉलनी येथे राहतात. दरम्यान पत्नी व मुले गावाला गेल्यामुळे जतीन हा एकटाच होता. सोमवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा रूग्णालयात कामावर होते. त्यानंतर ते घरी गेले. बुधवारी रात्री १० वाजता त्यांची पत्नी सुमित्रा ह्या मनमाड येथून घरी आल्या. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी भावाच्या मदतीने घर उघडण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या मजल्यावर जतीन यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.

पतीचा मृतदेह पाहून पत्नीने हंबरडा फोउला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जतीनने दोन दिवसांपुर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात वडील जयप्रकाश चांगरे, हितेंद्र व खूशाल दोन भाऊ, पत्नी सुमित्रा, मुलगा प्रतिक आणि मुलगी कुंकुम असा परिवार आहे. आज सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Share post
Previous Post

दिवाळीनंतर आजपासून उघडणार शाळा, सोमवारपासून पुन्हा ६ दिवस सुटी

Next Post

रॉकॉच्यावतीने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post
रॉकॉच्यावतीने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

रॉकॉच्यावतीने मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group