जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा दिवाळीच्या सुटीनंतर गुरुवारपासून सुरू होत आहे. शुक्रवारी होणाऱ्या संपादणूक सर्व्हे (एनएएस)च्या परीक्षेनंतर सोमवारपासून दिवाळीच्या वाढवलेल्या सहा दिवसांच्या सुट्या माध्यमिक शाळांना मिळणार आहे.
त्यामुळे या शाळा २२ तारखेपासून नियमित सुरुवात होणार आहे. तर प्राथमिक विभागाच्याही शाळा ११ व १३ नोव्हेंबरला नियमित भरणार आहे. त्यानंतर १५ व १६ राेजी पुन्हा सुट्या असून १७ नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरू होणार आहे. या बाबत प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढले आहे.
धुळे : प्राथमिक शाळांना दोन दिवसांच्या वाढीव सुट्या
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना दोन दिवसांच्या वाढीव सुट्या मिळणार आहेत. १७ पासून नियमि सुरू होतील.राष्ट्रीय संपादणूक चाचणीसाठी ११ ते १३ दरम्यान शंभर टक्के शाळा सुरु होतील. दिवाळीसाठी १ ते २० नोव्हेबंर दरम्यान सुट्या जाहीर केल्या.मात्र संपादणुक चाचणीमुळे सुट्यात बदल केल्याची माहिती शिक्षणाधिकारी मनिष पवार यांनी दिली.