जळगाव, प्रतिनिधी । मातीतून सोनं ऊगवणा-या देशातील करोडो जनतेचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणा-या बळीराजाच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी व वास्तव विचारांना ऊजाळा देण्यासाठी बलिप्रतिपदा चे दिवशी सकाळी मराठा सेवा संघाचे वतीने काव्यरत्नावली चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी दिपावली सणात बळीराजाचे महत्व विषद करुन छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रमाणे बळीराजाचीही भव्य मिरवणूक काढीत जावे असे आवाहन केले.सामाजिक कार्यकर्ते मुकुंदभाऊ सपकाळे यांनी बलिप्रतिपदा चे खरे निमित्त सांगितले. मराठा सेवासंघाचे जेष्ठ नेते सुरेंद्र पाटील यांनी शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळणेसाठी मनपा ने जागा ऊपलब्ध करुन देणेबाबत भुमिका मांडली.शेतकरी आंदोलनस्थळी दिल्ली येथे मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना व कार्यकर्ते दिनेश पाटील यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.बळीराजा प्रतिमेला प्रथम माल्यार्पण व वंदनपुजन विभागिय अध्यक्ष रामदादा पवार यांनी केले.कार्यक्रमास सुरेश पाटील, नगरसेवक सचिन पाटील ,मनपा अभियंता उदय पाटील,सुनिल सुर्यवंशी,व्हि झेड पाटील,मनोज पाटील,सुमित पाटील,हितेंद्र देशमुख ,किरण साळूंखे ,शंभू सोनवणे ,खुशाल चव्हाण ,हिरेश कदम,अजय पाटील,राजेश पाटील, दिलिप पाटील,विजय देसाई,मनोहर पाटील,पुरुषोत्तम चौधरी ,विवेक सुर्यवंशी,संदिप पाटील,किरण पाटील,प्रा.सुनिल गरुड,हर्षल गरुड ,हृषिकेश चव्हाण ,शैलेश शिरसाठ,दिपक सुर्यवंशी ,पंकज गरुड ,सी यु देसले,मधुकर पाटील,यु जी पाटील,विजय शिंदे,भगवान शिंदे , विजय पाटील,प्रमोद नाना पाटील,बाळासाहेब सुर्यवंशी ,प्रा.संजय पाटील,शिवाजी धुमाळ,मिलिंद पाटील,नितिन सोनवणे ,आर एन पाटील,अजिंक्य पाटील,रोहिदास पाटील,प्रफुल पाटील, प्रा.भगतसिंग निकम, मनोहर पाटील, सुजित शिंदे,राजेंंद्र पाटील,राहुल पाटील व आजी माजी पदाधिकारी ऊपस्थित होते.शेवटी कार्यक्रमास उपस्थितांचे आभार मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष एच् एच् चव्हाण यांनी मानले.