Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहरातील शिवकॉलनी उड्डाणपूल परिसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

by Divya Jalgaon Team
November 6, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
ट्रॅक्टरच्या धडकेत रिंगणगावचा तरुण जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शिवकॉलनी उड्डाणपूल परिसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील शिवकॉलनी उड्डाणपुला जवळ अप रेल्वेलाईनवर खंबा क्रमांक ४१७ /२०- १८ जवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शिरसोली येथील स्टेशन मास्तर कमलेश सिन्हा यांनी रामानंदनगर पोलिसांना कळविली. त्यानुसार रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक जितेंद्र तांबडे पोलिस कॉन्स्टेबल इकबाल पिंजारी पंकज पाटील या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

याप्रकरणी जळगाव रेल्वे स्टेशनची उपप्रबंधक यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहेत. मयताचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्ष असुन मजबूत जाडसर बांधा रंग गोरा उंची १६० सेंटीमीटर तर अंगात निळी जीन्स पँट व पांढऱ्या रंगाचा नक्षी असलेला शर्ट तसेच पांढरा बनियान व तपकिरी रंगाची अन्डर पँट असे मयताचे वर्णन आहे. घटनास्थळी मयताची स्पार्क कंपनीची चप्पल तसेच पांढरा हातरुमाल मिळून आला आहे.

या वर्णनानुसार मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रामानंदनगर पोलिसांनी केले आहे. कोणालाही मयताची ओळख पटल्यास त्यांनी रामानंदनगर पोलिसांशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

Share post
Previous Post

जळगावातील कांचन नगरात १५ हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास

Next Post

मराठा सेवा संघाच्यावतीने काव्यरत्नावली चौकात बळीराजाचे स्मृतींना वंदन

Next Post
मराठा सेवा संघाच्यावतीने काव्यरत्नावली चौकात बळीराजाचे स्मृतींना वंदन

मराठा सेवा संघाच्यावतीने काव्यरत्नावली चौकात बळीराजाचे स्मृतींना वंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group