जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुमारे दोन महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान झालेल्या हलगर्जीपणामुळे 32 वर्षीय युवक कै. शंकर निकम यांचा मृत्यू झाला असें निकम कुटूंबीयाचं म्हणणं आहे. कै. शंकर निकम हे कुटुंबातील एकमेव आधार असल्याने , कमवित्या व कर्त्या व्यक्तीचे डॉक्टरांच्या चुकीच्या इलाजाने निधन झालं .
त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.म्हणून कै. शंकर यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी कै. शंकर निकम यांची आई श्रीमती सुमनबाई निकम व पत्नी श्रीमती रेखा निकम या आठवड्या आधी आमरण उपोषणाला बसल्या होत्या .कै. शंकर यांच्या 3 वर्षीय कन्या कनक हिस सांभाळायला घरी कुणीही नसल्याने ती देखील दुर्दैवाने रात्रंदिवस त्यांच्याच सोबत उपोषण स्थळी होती . या चिमुरडीकडे बघुन छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष अमोल कोल्हे यांना खुप दुःख झाले आपण निकम कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांच्या मनाशी ठरवले. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून कै. शंकर मृत्यु प्रकरणी योग्य भूमिका घ्यावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी ही सदर कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.
शेवटी कै शंकर निकम यांच्या कुटूंबियांच्या उपोषणाची सांगता अमोल कोल्हे यांच्याच हातुन झाली . याप्रकरणी प्रक्रिया सुरू आहे व आवश्यकता पडल्यास आम्ही न्यायालयात देखील दाद मागणार आहोत ,असेही अमोल भाऊ कोल्हे यांनी सांगितलं आहे.
सदर दुर्दैवी घटना विसरणे कुटुंबियांना कधीही शक्य होणार नाही पण क्रूर नियतीवर मात करणे म्हणजेच जिवन होय .सगळी कडे दिवाळी सणाच्या मुहूर्तावर लगबग पाहता निराधार व असाह्य कुटूंबास सणासुदीला मदतीचा हात म्हणून छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यातर्फे निकम कुटुंबातील महिला यांना साड्या , चिमुकली कनक हिस ड्रेस व दिवाळीच्या फराळाच्या वस्तूचे किट भेट देण्यात आले व सदर कुटुंबाला विविध शासकीय योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदतही केली जाईल .
त्याच बरोबर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष दिप्ती भामरे यांनी सुद्धा अत्यावश्यक किराणा सामान भेट दिला . यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिव्या भोसले उपस्थित होत्या . चिमुकल्या कनक च्या चेहऱ्यावर हास्य फुलाविण्यासाठी आमचा छोटासा प्रयत्न यशस्वी झाला व कनक च्या चेहऱ्यावर हसू उमलले . मित्रांनो आपल्या सभोवताली असणाऱ्या गरजू लोकांना आपण देखील यथाशक्ती मदत करावी अशी विनंती ही छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अमोल कोल्हे यांनी या माध्यमातून केली आहे.