जळगाव प्रतिनिधी । दुचाकीवर मागे बसलेल्या विवाहितेच्या गळ्यातील मंगलपोत धूमस्टाईलने लंपास केल्याची घटना २ रोजीच्या दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील जामनेर येथून नातेवाईकाचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजारांची सोन्याची चैन चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना जळगाव औरंगाबाद रोडवर बाफना गो शाळेजवळ समोर घडली. जळगाव शहरातील रिंगरोड परिरातील रहिवासी सरोज प्रफुल्लकुमार चोपडा वय ५६ ह्या मंगळवारी सकाळी त्यांच्या काकसासर्यांच्या बाराव्याच्या कार्यक्रमासाठी जामनेर येथे गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून मंगळवारी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ पतीसह दुचाकी क्रमांक (एम.एच.१९ ए.आर.४१९६) ने जळगावकडे परतत होत्या. जळगाव-औरंगाबाद रोडवर बाफना गोशाळेसमोर चोपडा यांच्या मागून भरधाव वेगाने दुचाकीवरुन दोन जण आले. त्यापैकी मागे बसलेल्या एकाने सरोज चोपडा यांच्या गळ्यातील ८० हजारांची चैन धुमस्टाईल तोडून नेली. व भरधाव वेगाने पसार झाले.
याप्रकरणी विवाहिता सरोज चोपडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार करीत आहे