Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून केला विनयभंग

by Divya Jalgaon Team
October 30, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून केला विनयभंग

जळगाव, प्रतिनिधी । शहरात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून विनयभंग करत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्थानकात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘फक्त माझी आहेस, तू जर माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ या शब्दांत एकतर्फी प्रेमातून कुलदीप रवींद्र सपकाळे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याने शिवीगाळ करत १७ वर्षीय मुलीला धमकी दिली आहे. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी दुपारी अग्रवाल चौकात घडली आरोपी तरुणाविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कुलदीप काही दिवसांपासून गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. एकतर्फी प्रेमातून तो पीडित मुलीचा अनेकदा पाठलाग करायचा.

गुरुवारी पीडित मुलगी मैत्रिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेली होती. दोन्ही मुली अग्रवाल चौकातून जात असताना, आरोपी कुलदीपने पाठलाग करत पीडित मुलीला भररस्त्यात आडवलं. यावेळी आरोपीनं ‘तू फक्त माझी आहेस, आणि तू माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशा शब्दांत आरोपीनं पीडित मुलीला धमकी दिली आहे. यावेळी आरोपी पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील अश्लील शिवीगाळ केली आहे. दोघींना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. पीडित मुलीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Share post
Previous Post

टायगर ग्रुप जळगावतर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Next Post

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

Next Post
राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी बसेसचे कमाल भाडेदर निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group