प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विजय राज याला लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. चित्रपटातील एका अभिनेत्रीने त्याच्यावर छेडछाड केल्याचे आरोप केले आहेत. शिवाय या प्रकरणी तिने पोलीस तक्रार देखील केली. परिणामी गोंधियामधील एका हॉटेलमधून विजला पोलिसांनी अटक केली आहे.
विजय राज आपला आगामी चित्रपट घेऊन लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव शेरनी असं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने एका अभिनेत्रीसोबत गैरवर्तणुक केली असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.