मेष :- मानसिक चुळबुळ कमी करावी. काही गोष्टी शांत राहून बघत रहा. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.
वृषभ :- नवीन काम अंगावर येऊ शकते. विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आपली क्षमता लक्षात घ्यावी.
मिथुन :- कामात सकारात्मक बदल संभवतात. नियोजनबद्ध कामे करा. एकाचवेळी अनेक कामे हाती घेऊ नका. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.
कर्क :- आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कचेरीची कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मुलांबाबत आत्मविश्वास वाढेल.
सिंह :- अपेक्षित उत्तर हाती येईल. लहान प्रवास घडेल. कामात अनुकूलता येईल. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल.
कन्या :- मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. सहकारी वर्ग मदत करेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.
तूळ :- महत्त्वाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा. संभ्रमित गोष्टी पुढे ढकलाव्यात. दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना अतिरिक्त शब्दांचा वापर टाळावा.
वृश्चिक :- एखादी नवीन संधी चालून येईल. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते. गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका. एखादा वाद संपुष्टात येईल.
धनू :- घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. तरुण वर्गाचे सहकार्य घ्याल.
मकर :- अति धाडस दाखवू नका. मोठी खरेदी विचारपूर्वक करावी. जुगार खेळतांना सावध राहावे. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत.
कुंभ :- आपले स्पष्ट मत देताना विचार करा. फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत.
मीन :- काही खर्च अचानक सामोरे येतील. नातेवाईकांशी संपर्क होऊ शकेल. जवळचे मित्र भेटतील. हातातील कामातून आनंद मिळेल. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा.