पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील सार्वे-जामने गावात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व चिकन गुनिया चे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आढळून आले असता गावाकडे आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असा आरोप सरपंच संजय पाटील यांनी केला.
याबाबत माजी सरपंच संजय शांताराम पाटील यांनी पुढाकार घेऊन आ. गिरीश महाजन यांच्या माध्यमातून सर्व रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करून रुग्णांना औषधी मोफत देण्यात आले. 250 रुग्णाची रक्त तपासणी करण्यात तसेच 300 रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शांताराम सोनजी पाटील, संजय आबा पाटील, डॉ. महेंद्र चव्हाण, डॉ. मयुरी पवार, डॉ. योगेश डाखणे, जी. एम.फौंडेशन चे आरोग्यदूत पितांबर भावसार, अनिल सोनवणे उपस्थित होते. शिबीर यशस्वीते साठी ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटल व सार्वे-जामने ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.