जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी धुळे येथील शिशुगृहात पुढील पुनर्वसनाकरीता बालिकेला दाखल करण्यात आलेले आहे.
या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती, जळगाव या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 0257/ 2239851 तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव 0257/2228825 वर संपर्क साधावा. असे योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.