Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

न्यू बचपन प्ले स्कूल व माळीच क्लासेसतर्फे सत्कार सोहळा

by Divya Jalgaon Team
October 25, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
न्यू बचपन प्ले स्कूल व माळीच क्लासेसतर्फे सत्कार सोहळा

यावल, प्रतिनिधी । अ‍ॅड. देवकांत पाटील व योगिता पाटील यांचा न्यू बचपन प्ले स्कूल व माळीच क्लासेस यावल यांच्यातर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला.

दि. २४ रोजी रविवारी दुपारी १ वाजेला यावल येथे माळीज सभागृहातील कार्यक्रमात अ‍ॅड. देवकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विरावली व त्यांच्या सौभाग्यवती योगिता पाटील, न्यू बचपन प्ले स्कूल व माळीज क्लासेस चे संथापक अध्यक्ष कैलास माळी यांनी व त्यांच्या सहकारी संचालक मंडळ यांनी अ‍ॅड. देवकांत पाटील व योगिता पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेले विविध उपक्रम त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नवनवीन नावीन्य पूर्ण प्रयोग याची दखल घेत तसेच कोरोना काळात केलेली जनजागृती, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा, स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन शिबिर, बेसिक संगणक शिबिर, कोरोना काळात राज्यस्तरीय महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त घेतलेली ऑनलाईन स्पर्धा, तसेच रक्त तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, स्वछता विषयी जनजागृती, स्मशानभूमीत साफसफाई अभियान राबवणे नियमितपणे सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम घेणे. सामाजिक क्षेत्रात नेहमी सर्वांना मदत करत राहणे, राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून सामाजिक विषयांना हात घालत राहणे जनहिताचे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गे लावण्याचे महत्त्वपूर्ण योगदान याची दखल घेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह शॉल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक कैलास माळी तर सूत्रसंचालन सुधाकर बाऊस्कर यांनी केले. यामध्ये सामाजिक क्षेत्रातील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, ॲड. देवकांत पाटील तर शैक्षणिक क्षेत्रातील माजी प्राचार्य सुरेश वाघ, मुख्याध्यापक नितीन झांबरे, प्रा. नंदन वळींकार, सुनिल माळी, प्राचार्य एम. के.पाटील, स्निग्धा जोशी, सतिश मोरे आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. जागृती फेगडे, सुनिल देशमुख, गणेश देशमुखे, सुरेखा माळी, छत्रपती फाऊंडेशन संचालक पवन पाटील, हितेश गजरे, गिरीष पाटील, किशोर माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे आयोजक कैलास माळी यांनी मानले.

Share post
Previous Post

सार्वे-जामने गावात आ. गिरीष महाजन यांच्या माध्यमातून आरोग्यशिबीर

Next Post

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Next Post
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group