चोपडा, प्रतिनिधी । चोपडा शहरातील शासकीय विश्रामगृहावर आज तारीख 22 रोजी दुपारी ०५वाजता चोपड्याच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी चोपड्याची सुन भोईसर पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्या प्रित्यर्थ त्यांना गौरविण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार लताताई सोनवणे यांनी भोईसर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे विजयी झालेल्या सौ.ममता प्रमोद कंखरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी प्रमोद कंखरे,मुंबई नगरसेवक किशोर चौधरी,माजी उपसभापती एम. व्ही.पाटील बी.डि.ओ.कोसोदे,जि.प.सदस्य हरीष पाटील,नगरसेविका सौ.मनीषा जैस्वाल,राज्यात गौरवलेले विशेष छायाचित्रकार भगवान उर्फ छोटू वारडे,तालुकाप्रमुख राजू बिटवा,विकी शिरसाठ आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.