जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतांना बँकेला सहकार क्षेत्रातील अतिशय मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याने, बँकेच्या यशस्वी वाटचालीला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
आज नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट आणि फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअल स्वरूपात आयोजित परिषदेत हे पुरस्कार देण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात नॅशनल को-ऑपरेटीव्ह बँकींग समिट आणि फ्रंटीयर्स इन को-ऑपरेटीव्ह बँक यांच्यातर्फे जे.डी.सी.सी.बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना ‘वुमन लीडर ऑफ द इयर’ तर जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बेस्ट डिजीटल बँक’ पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.