जळगाव, प्रतिनिधी । करजोत ता. रावेर येथे अलफैज फाऊंडेशन ईदे मिलादुन्नबी सप्ताह निमित्त पै.मोहमद (स) ची मराठी पुस्तक भेट व सर्व धर्मिय विद्यार्थ्यांना वहया-शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
गावातील सरपंच, उपसरपंच व ज्येष्ठ सभासद व नागरीकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. करजोत ता. रावेर येथे जिल्हा परिषद उर्दु शाळेत अलफैज फाऊंडेशनतर्फे आयोजित ईदे मिलादुन्नबी सप्ताहनिमित्त गावाचे सरपंच, उपसरपंच व हिंदू – मुस्लीम ज्येष्ठ नागरिकांना मोहम्मद पैगंबर यांनी मानव समाजाला काय दिले? ही मराठीत लिहिलेल्या पुस्तक भेट देण्यात आली. याच बरोबर जिल्हा परिषद उर्दु व मराठी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वहया व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रम चे संचलन मौलाना आझाद लायब्ररी चे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार शकील शेख यांनी केले. आपल्या अध्यक्षिय भाषणात करीम सालार यांनी सांगितले कि, आज संपुर्ण जगात अराजकता दिसत आहे. भारतामधे जाती जातीत भांडणे लावून धार्मिक तेढ निर्माण केला जात आहे. देश व देशवासी कठीण परिस्थितीला तोंड देत आहे म्हणून देश मजबूत करण्यासाठी आपली एकता टिकवण्याची गरज आहे. एकमेकातील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या मानवता चा संदेश या पुस्तकाद्वारे देण्याचा प्रयत्न करीत आहोत. कार्यक्रमात करजोतचे सरपंच समाधान महाजन, उपसरपंच नरेंद्र महाजन, ग्रामपंचायत मेंबर अशोक वनारे, संतोष पाटील, केंद्र प्रमुख रईस शेख, शालेय समिएती सभापती अल्ताफ शेख, वाघोबा येथील माळी समाजाचे अध्यक्ष गुणवंत सातव, दक्षता समिती सदस्य भाग्यश्री आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमघे हाजी सत्तार शेख, अजीज शेख, राजेंद्र तडवी, अकील खान, डॉ. हनीफ शेख, रईस शेख, गणेश बोरनारे, उर्दु शाळेचे शफीक शेख, मराठी शाळेचे मुख्याध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते.