मुक्ताईनगर, प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जेष्ठ साहित्यिक तथा “फुले शाहू आंबेडकरी” साहित्याचे अभ्यासक यांना साहित्य क्षेत्रातील योगदाना बद्दल मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाली आहे.
सदर पदवीदान समारंभ दिनाक 23 रोजी “शेनबागा हॉटेल कॉन्वेशन सेंटर 432,महात्मा गांधी रोड पॉंडेचरी डॉ.पी.म्यँन्युल यांचे अध्यक्षतेखाली व डॉ. संपत कूमार (IAS) तामिळनाडू डॉ. एस. सुंदरम (पॉंडेचरी ) डॉ.सी आर भास्करन (चेन्नई )डॉ.आर आर धनपाल (नवी दिल्ली ) यांचे प्रमुख उपस्थितीत दिली जाणार आहे. त्यांचे आज पर्यंत पंधरा ते सोळा ग्रंथ प्रकाशित असून अनेक प्राध्यापक त्यांचे साहित्यावर संशोधन करीत आहे.त्या बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.