Thursday, February 19, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सूरतमध्ये भीषण आग, १२५ मजुरांना वाचविण्यात यश

by Divya Jalgaon Team
October 18, 2021
in राज्य
0
सूरतमध्ये भीषण आग, १२५ मजुरांना वाचविण्यात यश

सूरत, वृत्तसंस्था । गुजरातच्या सुरतजवळील कडोदरामध्ये गुजरात औद्योगिक विकास महामंडळात(GIDC) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विवा पॅकेजिंग मिलमध्ये लागल्यानंतर जीव वाचण्यासाठी काही मजुरांनी पाच मजल्यावरून उड्या मारल्या. तर, काही कारागीरांना हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने वाचवण्यात आलं. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झालाय तर काहीजण जखमी आहेत. दरम्यान, 125 मजुरांना वाचवण्यात आलं आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, घटनेची माहिती मिळथाच अग्निशमन दलाच्या 10 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, घटनास्थळी उच्च अधिकारीदेखील पोहोचले आहेत. अग्निशमन दलाने सांगितल्यानुसार, अग्निशमन दल बचाव कार्यासाठी येण्यापूर्वी काही कामगारांनी इमारतीवरुन खाली उड्या मारल्या.

बचावकार्य सुरू
सुरतचे महापौर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्याबरोबरच मदत आणि बचाव कार्यावरही भर दिला जात आहे. तसेच, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आगीचे कारणही शोधले जात आहे. यासह, या घटनेमुळे झालेल्या नुकसानीचेही मूल्यांकन केले जात आहे.

Share post
Previous Post

अ.फ.भालेराव “यांना ग्लोबल ह्यूमन पीस युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टर पदवी जाहीर

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलाद घरी राहूनच साजरी करावी – जिल्हाधिकारी

Next Post
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलाद घरी राहूनच साजरी करावी - जिल्हाधिकारी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलाद घरी राहूनच साजरी करावी - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group