जामनेर, प्रतिनिधी । जामनेर येथील स्थानिक इयत्ता बारावी शाखेमध्ये शिकणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने पब्जी खेळाच्या नादात स्वतः आत्महत्या केली. तशी सुसाईड नोट या मुलीने लिहून ठेवली आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी की कुमारी नम्रता पद्माकर खोडके [मूळ राहणार भराडी] हल्ली मुक्काम जामनेर या 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या वीस वर्षीय तरुणीने आज पब्जी खेळाच्या नादात एका स्टेपवर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. नम्रता चे वडील हे स्थानिक डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम पाहतात .तरुण मुलगी गेल्यामुळे आई-वडिलांवर आभाळ कोसळले . वडील हे डॉक्टर के. एम .जैन यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्य करतात . त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून आई वाकी रोडवर घरावर पाणी मारायला गेल्या , त्या वेळेला मुलीने ही कृत्य केले.