Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

काकाचा खून करणाऱ्या संशयीत आरोपीला स्थागुशाने केली अटक

by Divya Jalgaon Team
October 9, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
काकाचा खून करणाऱ्या संशयीत आरोपीला स्थागुशाने केली अटक

जळगाव, प्रतिनिधी । जळगावात काही दिवसांपूर्वी आंबेडकर नगर येथे काकाचा खून करण्यात आला होता याप्रकरणी संशयित आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे.

काकाचा खून करुन फरार झालेल्या संशयीत पुतण्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राजु पंडीत सोनवणे असे हत्या झालेल्या काकाचे तर सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (वय 33, रा. आंबेडकर नगर जुने जळगाव) असे अटकेतील संशयीत आरोपी असलेल्या पुतण्याचे नाव आहे.

या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.न. 200/21 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक केलेला संशयीत सुरज हा कोणताही कामधंदा करत नव्हता तसेच तो नेहमी व्यसन करत होता. त्यामुळे त्याचे काका त्याला नेहमी बोलत होते. वेळप्रसंगी ते त्याला मारहाण देखील करत होते. त्यामुळे सुरजच्या मनात काका राजु सोनवणे यांच्याबद्दल राग होता. त्या रागातून संधी साधत ते रात्रीच्या वेळी झोपेत असतांना सुरजने त्यांची हत्या केल्याचे कबुल केले आहे. सदर घटना घडल्यापासून सुरज फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पथक तयार केले होते.

त्या पथकात पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील यांचा समावेश करण्यात आला होता. पथकातील सर्व सहका-यांनी फरार सुरजचा विविध मार्गांनी माग काढला. मुंबई, नवी मुंबई, नाशिक, जळगाव व भुसावळ इत्यादी ठिकाणी फरार सुरजचा मागोवा घेण्यात आला. मात्र तो हाती लागत नव्हता.सुरज हा जळगाव शहराच्या भोईटे नगर भागातील रेल्वे मालधक्का परिसरात आला असल्याची माहिती पथकाला समजली. सापळा रचून त्याला शिताफीने अटक करण्यात आली.

सुरुवातीला आपली ओळख लपवणा-या सुरजने नंतर आपली ओळख उघड करत आपला गुन्हा देखील कबुल केला. त्याला अटक करण्यात आली. त्याचे काका राजु सोनवणे त्याला मारहाण करत त्रास देत होते. त्यामुळे त्याच्या मनात काकाविषयी राग निर्माण झाला होता. त्या रागातून त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले.

Share post
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर

Next Post

टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्ट मध्ये सहभागी शिक्षकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन

Next Post
टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्ट मध्ये सहभागी शिक्षकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन

टेली कॉलाबोरेशन प्रोजेक्ट मध्ये सहभागी शिक्षकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group