Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे – ना. एकनाथराव शिंदे

आ. किशोर अप्पा पाटील यांचा पाठपुरावा फलदायी

by Divya Jalgaon Team
October 9, 2021
in जळगाव
0
एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे - ना. एकनाथराव शिंदे

पाचोरा, प्रतिनिधी । येथील कै. के. एम. (बापु) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे. मात्र यातील अटी शर्ती बाबत आक्षेप घेत सदरील गाळे दुर्घमुदतीने देण्याची मागणी काही व्यापारी बांधवानी केली होती.

सदर गाळ्यांचे भाडे कमी करणे व सदरील गाळे दिर्घमुदतीने अर्थात २९ वर्षे कराराने देणेबाबत पालिका प्रशासनास विनंती केली होती. दरम्यान व्यापारी बांधवांच्या मागणीची दखल घेत आ. किशोर पाटील यांचे विनंतीवरून ना. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान मंत्री महोदयांनी गाळे दिर्घमुदतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र जावक क्रमांक एम यु एम 2021/ प्र क्र 272/नवी 17 दि 30 सप्टेंबर 2021 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन स्वयंस्पष्ट अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत व त्यानुसार पाचोरा पालिकेने तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे कडे सादर केला आहे. त्यामुळे आ. किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश येणार असून व्यापारी बांधवांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

दरम्यान या बैठकीला आ. किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच नगरपालिका प्रशासनातर्फे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपमुख्याधिकारी डी एस मराठे हे ऑनलाईन उपस्थित होते. सदर नवीन गाळ्याचे भाडे कमी करणे व गाळे दीर्घ मुदतीने भोगवटा ने देण्याकरिता सकारात्मक चर्चा झाली. मंत्री महोदयांनी सदर गाळे दीर्घ मुदतीने देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनास दिले आहे .यावेळी नगरविकास विभाग प्रधान सचिव भूषण गगराणी, विशेष कार्य अधिकारी कृष्णा जाधव व डॉ. राजेश कावडे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.

दरम्यान आ.किशोर अप्पा पाटील यांनी ना.शिंदे यांचेकडे राज्यातील १९९३ पूर्वी सेवेत रोजंदारी कर्मचारी म्हणून दाखल झालेल्या सफाई कर्मचारी यांना वारसा हक्क देण्याबाबत मागणी केली होती या मागणीला देखील मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे पाचोरा नगरपालिकेच्या ६० कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील सफाई कामगार बांधवाना याचा लाभ मिळणार आहे.

शासनाच्या या होऊ घातलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा लाभ राज्यभरातील पालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे धारक व्यापारी बांधवांना व सफाई कामगार बांधवांना होणार असून ही त्यांना शासनाकडून ही जणू दिवाळी भेट मिळणार आहे.
किशोर अप्पा पाटील
आमदार – पाचोरा- भडगाव

Share post
Previous Post

शासनाने ओला दुष्काळ जाहिर करण्यात करावा – डॉ. नीलकंठ पाटील

Next Post

शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुषार पाटीलसह त्यांच्या पॅनलच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

Next Post

शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुषार पाटीलसह त्यांच्या पॅनलच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group