जळगाव- मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोक सेवा अकादमी राज्यस्तरीय गुणगौरव महासंमेलन २०२० या पुरस्कारासाठी ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून अश्विनी प्रताप निकम महिला पोलीस कराटे प्रशिक्षक यांची निवड करण्यात आली होती.अश्विनी निकम यांना “नारीशक्ती रत्न” पुरस्काराने सन्मानित.
तसेच त्यांना ३० सप्टेंबर २०२० रोजी नारी शक्ती रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले, हा पुरस्कार ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. कोविड -१९ च्या प्रभावामुळे प्रत्यक्ष होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला व पुरस्कार पोस्टाद्वारे पाठवण्यात आला.अश्विनी निकम यांना “नारीशक्ती रत्न” पुरस्काराने सन्मानित .
गेल्या दोन दिवसांपूर्वीच अश्विनी प्रताप निकम महिला पोलीस कराटे प्रशिक्षक यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ . प्रविण मुंढे यांच्या हस्ते व पोलीस उपअधीक्षक ( गृह ) दिलीप पाटील , पोलीस निरिक्षक राजेशसिह चांदेल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. पोलीस प्रशासनामध्ये महाराष्ट्रातून एकमेव महिला पोलीस कराटे प्रशिक्षक पो कॉ .अश्विनी प्रताप निकम यांना महाराष्ट्र राज्याचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे प्रशासनामध्ये कौतुक केले गेले.
तसेच पोलीस अधीक्षक डॉ . प्रविण मुंढे यांनी अश्विनी प्रताप निकम यांच्या पुढील वाटचालीसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जोमाने प्रयत्न करावे व प्रशासनाचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छापर शब्दांचा वर्षाव केला. पो कॉ . अश्विनी प्रताप निकम या जिल्हा विशेष शाखा अंतर्गत पोलीस कराटे प्रशिक्षण केंद्र मानव संसाधन विभाग याठिकाणी पोलीस पाल्य व बाहेरील विद्यार्थ्यांना कराटे स्वसंरक्षण तसेच स्केटिंग चे प्रशिक्षण देत आहेत. एका वर्षाच्या कामात त्यांनी प्रशासनाला दिलेला हा फार मोठा आणि स्तुत्य निकाल आहे.
अजून वाचा
जळगावात नाभिक समाजाची बैठक संपन्न