मुक्ताईनगर – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून चित्रपालट झालेले दिसत आहे.
याच पाश्र्वभूमीवर जामनेर तालुक्यातील देवपिंपरी सह परिसरातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जामनेर तालुक्यातील देवपिंपरी परिसरातील जवळपास पावणे दोनशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मुक्ताईनगर येथील खडसे फार्म येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र पाटील व जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. याप्रसंगी एडवोकेट रवींद्र पाटील म्हणाले की, आता फक्त जामनेरच नव्हे तर जिल्हाभरातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कल वाढणार असून यातून पक्ष सशक्त होणार आहे एकनाथराव खडसे यांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.