जळगाव – शहरातील शानबाग हाँल येथे जिल्हा नाभिक समाजाची बैठक घेण्यात आली. बैठकीचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे यांनी केले. तसेच जळगाव जिल्हा नविन कार्यकारीणीचे बैठक मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष वसंतराव साळूके गुरुजी (जामनेर) हे होते.
सर्वप्रथम भारतमाता व संत सेना महाराज प्रतिमापूजन व श्रध्दाजंली अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीचा परिचय व त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजाचे केद्रबिंदू असणाऱ्या सलून काम करणाऱ्या समाज बांधवासाठी नवनवीन सकल्पना उपक्रम जिल्हा भरातून आलेल्या पदाधिकारींनी सुचविले.
समाजाची जिल्हा स्तरावर एक न्याय अन्याय समन्वय समिती आणि आरोग्य समितीची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले तसेच गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा,कार्यशाळा, वधुवर परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे ई.उपक्रम ठरवण्यात आले.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नानाभाऊ शिरसाठ, राज्य कार्य.सदस्य अनिल जगताप , जिल्हा प्रवक्ता नाना वाघ, राज्य कार्य . सदस्य सुनिल बोरसे, सुधाकर संनांसे, ह.भ प श्री मनोहर खोंडे, जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना चद्रकांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जामनेर शिवाजी बहाळकर, चाळीसगाव जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष चोपडा प्रशांत बाणाईत, जिल्हा उपाध्यक्ष भुसावळ यांनी मार्गदर्शन केले. तर सुत्रसंचालन सचिव कुमार सिरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे यांनी केले. याप्रसंगी सर्व पुढील जिल्हा कार्य कारिणी बैठकीसाठी उपस्थित होते.
भुसावळ महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल जगताप, भुसावळ महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य कार्यकारीणी सदस्य सुधाकर सनंसे, सुनिल बोरसे, शिवाजी बहाळकर, चंद्रकांत शिंदे, प्रशांत बानाईत, उमाकांत निकम, पृथ्वीराज सोनवणे, कुमार सिरामे, वामन वाघ, संतोष कुवर, रघुनाथ खोंडे, भरत चव्हाण भडगाव, अरुण श्रीखंडे, अमोल आमोदकर, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.