जळगाव, प्रतिनिधी । शहरातील दादावाडी येथे समाज हिताच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी उपक्रमांच्या आयोजनासाठी युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र राज्यच्या समस्त पदाधिकाऱ्यांची बैठक दि ३ रविवार रोजी संपन्न झाली.
दि.०३ रोजी जळगाव शहरातील आयडीय स्कूल, दादावाडी येथे समाज हिताच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी उपक्रमांच्या आयोजनासाठी युवा गुर्जर महासभा महाराष्ट्र राज्य च्या समस्त पदाधिकार्यांची बैठक प्रदेश अध्यक्ष मा. श्री. दिग्विजय पाटील यांचा उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. नवलसिंग राजे पाटील (स्विय्य सहाय्यक, मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील मंत्री म.रा.), महिला प्रदेश अध्यक्ष मा. श्रीमती. शकुंतलाताई पाटील, मा. प्रदेश महासचिव श्रीराम पाटील, म.न.पा. नगरसेवक मा. श्री चंद्रशेखर पाटील हे होते.
तसेच सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार उपस्थितांचा समक्ष करून आईडल इंग्लिश मेडियम स्कुल येथे मार्गदर्शन करतांना समस्त जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी समाज हिताच्या दृष्टिकोनातून कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करणे, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचुन महासभेच्या वतीने सहकार्य करणे उदा. शैक्षणिक व आरोग्य विषयक इ. बाबतीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश अध्यक्ष यांनी सूचना केल्यात. तसेच प्रमुख उपस्थिती नवलसिंगजी राजे पाटील यांनी पदाधिकार्यांना बंधुभाव व आपुलकीच्या माध्यमातून संघटन वाढीस बळ द्यावा असे मत व्यक्त केले. व म.न.पा. नगरसेवक चंद्रशेखर पाटील यांनी गुर्जर समाजाचे राजकीय महत्व विषद करतांना गुर्जर समाज हा अल्पसंख्यांक समाज यामध्ये प्रत्येकाने मातृ भाषा म्हणून गुजर ही भाषा जन्म दाखल्यावर नमुद करणेसाठी आवाहन केले. सदरील बैठकीचे आयोजन जळगाव महानगर कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले असून यावेळी बैठकीचे सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष महेंद्र डि. गुर्जर व बैठकिचा शेवट जिल्हा कार्याध्यक्ष जयेश गुजर यांनी समस्त उपस्थित पदाधिकार्यांचे आभार व्यक्त केले.