चोपडा, प्रतिनिधी । चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चे शिक्षक किरण आनंदा चौधरी यांना ग्लोबल टॉक एज्युकेशन फाउंडेशन द्वारे भारतीय शिक्षा रत्न पुरस्कार देऊन दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार समजला जातो. सदरचा पुरस्कार दिनांक 13 ऑक्टोबर 20 21 रोजी दिल्ली येथे मालदीव चे शिक्षण मंत्री अब्दुलला रसीद एन आय ओ एस चे माजी अध्यक्ष, सी बी शर्मा भारत सरकार एनसीईआरटी चे सचिव, मेजर हर्षकुमार नवी दिल्ली पश्चिम क्षेत्राचे सी बी एस सी चे प्रादेशिक अधिकारी जयप्रकाश चतुर्वेदी यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला .शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात त्याच बरोबर डिजिटल क्षेत्रात शिक्षणात भरीव काम केल्याने सदरचा पुरस्कार श्री किरण चौधरी यांना प्राप्त झाला .या पुरस्कारामुळे पंकज ग्लोबल स्कूलचे संचालक मंडळ व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला .संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब बोरोले, श्री पंकज बोरोले यांनी त्यांचे अभिनंदन केले .प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के डी चौधरी, तेली समाजाचे उपाध्यक्ष टी. एम .चौधरी, प्रदेश तेली महासंघ चोपडा तालुका अध्यक्ष प्रशांत चौधरी महिला अध्यक्ष सौ सीमा चौधरी, महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष देवकांत चौधरी यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.