जळगाव, प्रतिनिधी । आज दि.2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त व भारत देशाच्या स्वातंत्र्य चा अमृत महोत्सवी वर्ष निमित्त महसूल विभाग धरणगाव तर्फे बांभोरी प्र.चा.गावात आदरणीय मा.गुलाबरावजी पाटील,स्वछता व पाणीपुरवठा मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री ,यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल 7/12 चे वाटप,संजय गांधी निराधार योजनेचा मंजूर प्रकरणे ,रेशन कार्ड,वाटप करण्यात आले, व गिरणा नदीच्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या पंढरीनाथ सपकाळे च्या कुटुंबातील व्यक्तींना 4लाख रुपयांचा धनादेश,पिठाची गिरणी व 1 महिन्याचे रेशन पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर कार्यक्रमात मा.अभिजित राऊत साहेब,जिल्हाधिकारी-जळगांव, पंकजकुमार आशिया,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव महाजन साहेब,उपजिल्हाधिकारी,जळगाव गोसावी साहेब,प्रांत अधिकारी, एरंडोल, देवरे साहेब,तहसीलदार, धरणगाव, सातपुते साहेब,नायब तहसिलदार, धरणगाव
मा.सचिन बिऱ्हाडे,सरपंच-बांभोरी प्र.चा. रवींद्र शेठ नन्नवरे,माजी सभापती,धरणगाव पंचायत समिती, मा.गोपाल शेठ नन्नवरे,माजी सरपंच बांभोरी, मा.ईश्वर शेठ नन्नवरे,माजी सरपंच-बांभोरी, गणेश बुवा साहेब,पोलीस उपनिरीक्षक, पाळधी, मा.सदाशिव पाटील,सरपंच-आव्हाने, अमोल पाटील,मंडळ अधिकारी
मा.गजानन बिंडवाल,तलाठी, मा.दीपक पाठक, ग्रामसेवक बांभोरी, संदीप कोळी,ग्रामपंचायत सदस्य, बांभोरी, नारायण सोनवणे,तलाठी कार्यालय,बांभोरी
तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,कोतवाल,कर्मचारी, शेतकरी,व गावातील सर्व माजी सरपंच व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,युवक,महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.