जळगाव, प्रतिनिधी । आज 2 रोजी “गांधी जयंती” च्या निमित्ताने इकरा बी.एड कॉलेज, जळगाव द्वारे एका ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.अ. करीम सालार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. बी.एड कॉलेजचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. F.Y.B.Ed.चे विद्यार्थी योगेश पाटील यांनी गांधीजींच्या चरित्राच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. विद्यार्थिनी आफरीन खाटीक आणि यास्मीन फातेमा यांनी महात्मा गांधींनी दिलेले सत्य आणि अहिंसा आणि गांधजींचे शैक्षणिक तत्वज्ञान यावर प्रकाश टाकला.
प्र. प्राचार्य प्रा.इरफान शेख यांनी विविध संदर्भ देऊन निदर्शनास आणून दिले की गांधीजींची सत्य आणि सहिष्णुतेची विचारधारा ही आजच्या समाजाची गरज आहे. डॉ. अ. करीम सालार यांनी आपल्या भाषणात सांगितले की “गांधीवादी तत्त्वज्ञान ही मानवतेच्या अस्तित्वासाठी काळाची गरज आहे”. भविष्यातील शिक्षकांनी त्यांच्या जीवनात अहिंसा, सत्य, समानता आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांचे पालन करावे आणि महात्मा गांधींची ही विचारधारा आपल्या अध्यापनातून पसरवावी असे आवाहनही त्यांनी केले. प्रा.व्ही.टी. पठाण यांनी संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुरेखपणे संचालन केले आणि प्रा.डॉ.इश्वर सोंगरे यांनी आभार प्रदर्शन केले.