जळगाव, प्रतिनिधी । पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव श्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत चांदसर तालुका धरणगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत स्वचतेचा जागर करू शोष्टखड्ड्याचा वापर अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव डॉ.श्री पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी श्री प्रवीण महाजन, उप विभागीय अधिकारी एरंडोल श्री गोसावी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.दिगंबर लोखंडे, गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे, व अन्य अधिकारी उपस्थित होते. या अभियानामध्ये जिल्हाभरात प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये पुढील 100 दिवसात 50 शोषखड्डे तसेच मागणी प्रमाणे nadep खताचे खड्डे याचे बांधकाम लोकसहभाग ,15 वित्त आयोग ,MGNREGA आशा विविध योजनेमधून करणार आहेत .प्रति तालुका 25 घनवन प्रकल्प साकारणार आहेत तसेच घरातील प्लास्टिक घरातील bottle कुंडी किंवा रिकाम्या डब्ब्यात भरून ठेवून नंतर ग्राम पंचायत स्तरावर त्याचे संकलन करण्यात येणार आहे. तसेच 16 कलमी कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक शाळा अंगणवाडी याना सुलभ शौचालय विज जोडणी परसबाग पिण्याच्या पाण्याची सुविधा डिजिटल शिक्षण इत्यादी बाबीचा समावेश असणार आहे.
यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वच्छतेचे महत्व तसेच स्वच्छतेमुळे कोविड सारखे संकट कसे पळवून लावू शकतो हे विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट करून दिले. तसेच लोकसहभाग असेल आणि सरपंच चांगला असेल तर चांदसर सारखी प्रगती होऊ शकते याबाबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे आणि सरपंच सचिन पवार यांचे कौतुक केले . तसेच ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग् विकासामध्ये मोलाची साथ लाभल्यास गावाची नक्कीच प्रगती होते यावेळी मनोगतातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आरोग्याची पंचसूत्री सांगितली व स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.तसेच पीक पेरा व इ सातबारा याबद्दल माहिती दिली प्रातिनिधिक स्वरूपात दोन शेतकऱ्यांना सातबाराचे वाटप करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री पंकज आशिया यांनी या अभियानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच येत्या 100 . दिवसात करावयाच्या कामाचे नियोजन सांगितले प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी तर सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञश्री मनोहर सोनवणे यांनी केले. यावेळी वृक्षलागवड शालेय परिसरात करण्यात आली ग्राम पंचायत मार्फत करण्यात आलेल्या अंगणवाडी सुशोभीकरण कामाची पाहणी केली.आभार प्रदर्शनामध्ये सरपंच श्री सचिन पवार यांनी जिल्ह्यातील पहिली वातानुकूलित अंगणवाडी सुरू करण्याचा मानस व्यक्त केला व व गटविकास अधिकारी स्नेहा कुडचे यांनी केले. छत्री लेणी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी मुख्याध्यापक मुख्याध्यापक यांनी मेहनत घेतली