जळगाव, प्रतिनिधी । भारत सरकार मान्यताप्राप्त. भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटना. महाराष्ट्र राज्य. जळगाव. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब रघुनाथरावजी कांबळे साहेब. यांनी कुर्डूवाडी जि.सोलापूर.नगरपरिषदेचा जवळजवळ पाचशे कोटी रुपयांचा रुपयांचा घोटाळा पुराव्यासहित उघडकीस आणून सुद्धा शासन प्रशासनाने संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई गुन्हा,अथवा एफ.आय.आर.ची नोंद पुरावे असल्यावर सुद्धा केलेली नाही.
संस्थापक अध्यक्ष यांनी सदर पुरावे पोलीस प्रशासनापासून तर संबंधित आणि जबाबदार अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा गुन्ह्याची नोंद झालेले नाही. या कारणास्तव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अध्यक्ष. उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष यांचे आदेशानुसार लाक्षणिक उपोषण दि 30 गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख संतोष कांबळे व कैलास सातपुते, महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख अध्यक्ष रविंद्र हनवते, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गुलाब मामूजी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संतोष पवार यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष वैद्य गणेश घोपे, सचिव विनोद बेरभैयाजी, उपसचिव रितेश नेवे, कार्याध्यक्ष हिम्मत पाटील, महानगर अध्यक्ष दिलीप साळुंके, संपर्कप्रमुख अतुल महाजन, संघटनेचे राजू सपकाळे, अरुण सपकाळे, तालुकाध्यक्ष सलीम मन्यार, रसूल मन्यार, आसिफ मन्यार व महिला कार्यकारिणीचे सुरेखा कोळी, संगीता वरुळकर, व इतर पदाधिकारी यांचे उपस्थितीत शांततामय मार्गाने कायद्याच्या चौकटीत सोशल डिस्टनसिंगचे भान ठेवून लाक्षणिक उपोषण पार पडले.