जळगाव, प्रतिनिधी । आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंर्तगत इकरा युनानी मेडीकल कॉलेजतर्फे दि. २९ बुधवार रोजी मेडीकल कॅम्पचे शिरसोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष अ. करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिरसोलीचे सरपंच हिलाल भील, उपसरपंच श्रावण शंकर ताड़े व ग्रामपंचायत सदस्य विनोद बारी, शशिकांत बारी, गौतम चौरे, सुभाष बारी, भगवान बोबड़े, ग्रामसेवक सुनिल दांडगे, नानाभाऊ पाटील, वनाभाऊ बारी, उमेश माळी, सुनिल बारी यांचे पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे उप- प्रचार्य डॉ. शोएब शेख यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉक्टर व हॉस्पीटलचे कर्मचारी उपस्थीत होते. शिरसोली येथील बारी समाज मंगल कार्यालयात आरोग्य शिबीराचे आयोजन तेथील ग्रामस्थ व सरपंच यांच्या सहकार्यान करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात रक्त लघवी व रुग्णांची आरोग्य तपासणी मोफत करुन त्यांना औषधी देण्यात आले. एकुण 619 रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. अ करीम सालार ,अ. ऐजाज मलिक, अ.अजीज सालार, शिरसोलीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ , कॉलेजचे प्राचार्य शिक्षक व शिकोत्तर कार्मचारी उपस्थीत होते. या कार्यक्रमात अ. करीम सालार यांनी ,शिरसोलीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी कमी वेळात लोकांन मध्ये आरोग्य विषयक प्रचार व प्रसार करुन जास्तीत जास्त लोकांनी या शिबीराचा फायदा घेतला म्हणुन कौतुक केले. तसेच आरोग्यसाठी युनानी औषधोउपचार हे कोरोना काळात व नंतर सुध्दा किती महत्वाचे असते. त्याबाबत माहिती दिली. व रोजच्या जिवनात व्यायम करणे आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ शोएब शेख यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. डॉ अजीम शेख , डॉ. अनीस शेख. डॉ नाजेमा खान , डॉ समीना खान, व हॉस्पीटलचे कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी परीश्रम घेतले.