Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मुंबई कार्यालयातील ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

by Divya Jalgaon Team
September 29, 2021
in राज्य
0
मुंबई कार्यालयातील ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

मुंबई, वृत्तसंस्था । अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयातील सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे. राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील प्रकरणे सध्या मुंबईचे कार्यालय हाताळत असताना ही बदली करण्यात आली आहे.

सत्यव्रत कुमार हे ईडीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ वाढविण्यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाने कार्मिक विभागाकडे पाठविला होता. त्यास मंजुरी देण्यापूर्वी केंद्रीय दक्षता आयोगाची मान्यता घ्यावी लागते. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्षांच्या समितीने हा प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे दीर्घकाळ मुंबईत राहिलेले सत्यव्रत कुमार हे त्यांच्या मूळ विभागात (कस्टम आणि केंद्रीय अबकारी) परत जातील.

सत्यव्रत कुमार यांना सहसंचालक पदावर कायम ठेवत सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत ईडी संचालकांचे सल्लागार ही जबाबदारी देण्यात आली होती. दुसरे सहसंचालक योगेश वर्मा हे मुख्यत्वे मुंबई कार्यालयाचा कार्यभार पाहत होते. ईडीच्या मुंबई कार्यालयातील विशेष संचालक सुशीलकुमार यांना सहा महिन्यांपूर्वी प्राप्तीकर या त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्यात आले होते.

Share post
Previous Post

हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून

Next Post

राज्य सरकार : शिवभोजन थाळी १ ऑक्टोबरपासून १० रुपयांना मिळणार

Next Post
महत्त्वपूर्ण निर्णय : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीची किंमत ५ रुपयेच

राज्य सरकार : शिवभोजन थाळी १ ऑक्टोबरपासून १० रुपयांना मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group