Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून

by Divya Jalgaon Team
September 29, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

नाशिक, वृत्तसंस्था । नाशिकरोड येथील हॉटेल मध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून गळा दाबून खून घटना घडली असून नाशिकरोड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. पत्नीचा खून केल्यानंतर हॉटेल मधून बाहेर पडणाऱ्या पतीला नाशिकरोड पोलिसांनी बिटको पॉईंट परिसरातून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे सासरी राहणाऱ्या ज्योती पोपट वीर व पती पोपट वीर यांच्यात वाद सुरू होता. त्या कारणावरुन ज्योती या जेलरोड भागातील त्यांच्या माहेरी काही दिवसांपूर्वी आलेल्या होत्या. पती पोपट याने पत्नी ज्योतीला मंगळवारी (दि.२८) सायंकाळी नाशिकरोडच्या बिटको पॉईंट येथील पवन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा खटके उडाल्याने रुममध्येच पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर महिलेचा पती संशयित पोपट हा फरार होण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयित पोपटला ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश न्याहळदे, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Share post
Previous Post

शिवसेना वाढली पाहिजे हे सेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण करायचेय

Next Post

मुंबई कार्यालयातील ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

Next Post
मुंबई कार्यालयातील ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

मुंबई कार्यालयातील ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group