मुंबई : एकनाथराव खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांचा द्वेष करणं बंद करावं असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
ओबीसी म्हणजे एकनाथ खडसे नाहीत असंही ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला.
प्रवीण दरेकर यांनी म्हटले कि, “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी जेवढे काम केले तेवढे कोणीही केले नाही. फडणवीस सरकारने अनेक प्रश्न मार्गी लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील ओबीसी समाजातूनच येतात पण आम्ही उल्लेख करत नाही. भाजपाला टार्गेट केलं जात असल्याने आम्हाला तो उल्लेख करावा लागतो”.