अहमदनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपमध्ये आऊटगोईंग सुरू झाले आहे. आता अहमदनगरमध्येही भाजप कार्यकर्त्यांची नाराजी समोर आली आहे. ‘पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत.
मात्र, आमचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार यात कुठलीही शंका नाही. पाच वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण होतील यामुळेच त्याच्या पुढली पाच वर्ष सुद्धा आमचंच सरकार असेल, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला.
अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे.
राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर मनमानी कारभार करत असून पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत असल्याचा निषेध करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यासह परीसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांनी आपल्यापदाचा रविवारी राजीनामे दिले आहे.
जळगावात 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत
दरम्यान, खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश करून काही दिवस होत नाही तेच जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते गळाला लागले आहे. जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.
‘संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम आहे’, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.
अजून वाचा
भाजपचे कार्यकर्ते नाराज- एकनाथराव खडसे