जळगाव, प्रतिनिधी । येथील केमिस्ट भवन येथे गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आले असून व परिसरातील वृक्षारोपण करून तेथेच पाण्याच्या टबमध्ये गणरायाचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
शहरात दरवर्षीप्रमाणे केमिस्ट असोसिएशनतर्फे केमिस्ट भवन येथे गणरायाची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान मंगळवार दि. १४ रोजी गणरायाचे विसर्जन करण्यात आले. त्यानिमित्त आयएमएचे माजी सचिव डॉ. स्नेहल फेगडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. किरण पाटील, डॉ. संजय पाटील, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे व मान्यवरांच्या हस्ते केमिस्ट भवनाच्या परिसरात वृक्षरोपण करण्यात आले.