Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

by Divya Jalgaon Team
September 14, 2021
in जळगाव
0
शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगाव, प्रतिनिधी । भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती, शिक्षण फी, परीक्षा व इतर शैक्षणिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

कोविड-१९ विषाणूच्या संसर्गामुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाइन पध्दतीने अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहत नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केले नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने मुदतवाढ दिली आहे.

राज्यातील विविध महाविद्यालयामध्ये सन २०२०-२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तत्काळ https:// mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावेत.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालयस्तरावर याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी. महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज तत्काळ ऑनलाइन प्रणालीतून संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी कळविले आहे.

Share post
Previous Post

जळगाव केमिस्ट भवनात गणरायाचे पाचव्या दिवशी विसर्जन

Next Post

ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपातर्फे आंदोलन

Next Post
ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपातर्फे आंदोलन

ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपातर्फे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group