जळगाव, प्रतिनिधी । सप्तरंग मराठी चॅनलतर्फे ऍड. संजय राणे यांना जळगाव गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
दि. ११ रोजी सप्तरंग मराठी चैनलतर्फे हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज मध्ये सप्तरंग चे संचालक पंकज कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वकील, वैद्यकीय क्षेत्र, पत्रकारिता, विधि, शेती पोलीस दल, साहित्य लेखन, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या विविध मान्यवरांचा जळगाव गौरव २०२१ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यात डॉक्टर राहुल महाजन, कॅन्सर तज्ञ निलेश चांडक, संघपाल तायडे आदींसह विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यात ऍड. संजय राणे यांचा कुटुंबासह प्रसिद्ध सिने अभिनेते शशांक केतकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी खासदार रक्षा खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.