जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव छत्रनेता संमेलन या कार्यक्रमां मध्ये जळगाव महानगर व तीन ही नगर कार्यकारीणी घोषीत करण्यात आल्या, या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे तसेच प्रमुख उपस्थित प्रा. श्रीकांत चौधरी व्यवस्थापन परिषद सदस्य व संचालक गणित व संख्याशास्त्र प्र शाळा कबचौउमवी जळगाव हे होते.
या कार्यक्रमासाठी निर्वाचन अधिकारी म्हणुन अभाविप जळगाव विभाग प्रमुख प्रा.डॉ मनीष जोशी यांनी काम पाहिले, यावेळी मंच्यावर महानगर अध्यक्ष डॉ.प्रा.भूषण राजपूत, महानगरमंत्री आदेश पाटील व एस. आर. चौधरी यांची उपस्थिती होती. अभाविप प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी अभाविप मांडणी करत कार्यकर्त्यांना परिषदेचे काम समजावून सांगितले. परिषदेमध्ये पद नसून प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी देत असतो, म्हणून आपण सर्वांना मिळालेली जबाबदारीला योग्य न्याय द्यावा व राष्ट्र कार्यात सामील व्हावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
महानगर मंत्री आदेश पाटील यांनी मंत्री प्रतिवेदनात वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा दिला. नूतन कार्यकारणी घोषणेत जळगाव महानगर अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.अमरदीप पाटील सर व उपाध्यक्ष म्हणून प्रा. गौरव खोडपे सर यांची नियुक्ती झाली. महानगर मंत्री म्हणून रितेश महाजन व महानगर सहमंत्री प्रज्वल पाटील व पोर्णीमा देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. कवियत्री बहिणाबाई नगर अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. मुझाईद हुसेन सर व उपाध्यक्ष म्हणून प्रा.पवित्रा पाटील, नगर मंत्री आकाश पाटील व नगर सहमंत्री श्रद्धा सोनार व नितेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर अध्यक्ष म्हणून डॉ.प्रा.सिद्धार्थ चौधरी उपाध्यक्ष प्रा. हितेश ब्रिजवासी नगर मंत्री मयूर माळी नगर सहमंत्री म्हणून भाग्यश्री कोळी यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज नगर अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ. अखिलेश शर्मा उपाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. स्नेहलता शिरुडे नगर मंत्री गौरवी चौधरी व नगर सहमंत्री चैतन्य बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिराग तायडे यांनी केले, शेवटी चैतन्य बोरसे यांनी आभारप्रदर्शन केले.