जळगाव, प्रतिनिधी । कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दिड दोन वर्षांपासून शाळा घरुनच होत असल्याने पालकांना शिक्षकांची भूमिका करावी लागत आहे, त्यामुळेच पालक आणि शिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावत असणार्या पालकांचा प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पालक शिक्षक संघाच्या वतीने कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता.याच कार्यक्रमात पालक शिक्षक संघाच्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण सुद्धा करण्यात आले. यात पठण , वकृत्व, सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला, नाट्यछटा स्पर्धा, स्मरणशक्ती अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आर. एस. शिरसाठ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांनी केले.कार्यक्रमाला भावना पाटील, सुनिता पाटील, वैशाली पाटील चैतन्या सपकाळे हे पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.बी.कोळी यांनी तर आभार पी.सी.लोहार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनिषा ठोसरे, पराग राणे, इ.पी.पाचपांडे, डी.बी. चौधरी आर.एन.तडवी. चंदन खरे, अनिल शिवदे यांनी सहकार्य केले.