एरंडोल, प्रतिनिधी । येथे २०२१ या वर्षात ४५ विजचोरी करणार्या ग्राहक आढळुन आले असता त्यांचेकडून ५लाख ८३हजार ३४५ रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहीती पञकार शैलेश चौधरी यांनी विचारलेल्या माहीतीच्या अधिकारातून एरंडोल विज उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता महाजन यांनी दिली आहे.
शैलेश चौधरी यांनी विजप्रशासनाकडे माहीतीच्या अधिकारात सन २०२०ते१९जुलै २०२१ दरम्यान च्या शहरातील एकूण विजचोर्या,सन २०ते२१ मधील विजचोरी मोहीमेचा कालावधी कुठुन कुठपर्यंत होता/आहे,औद्योगिक प्रतीष्ठानांना असलेले दर ई. बाबत माहीती मागीतली असता विजचोरी प्रकरणातील ग्राहकांची विगतवारी दिली नाही या मागे नेमके गौडबंगाल काय?
तसेच जिल्हा भरारी पथकाकडून सुचना आल्यावरच स्थानिक विज प्रशासन विजचोरी ची मोहीम राबवते.अशी तोंडी माहीती उपअभियंता महाजन यांनी देऊन वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. प्रभागनिहाय विजचोरी व मिटरधारकांची माहीती देता येत नाही अशी नकारघंटा दाखविण्यात आली आहे. याप्रकरणी पञकार शैलेश चौधरी वरीष्ठांकडे अपिल करणार आहेत.याशिवाय उर्जामंञ्यांकडे ही याप्रकरणी दाद मागणार आहेत.