जळगाव, प्रतिनिधी । उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून गणरायचे आगमन होणार आहे.या उत्साहात सर्वच आनंदाने सामील होत असतात.याच पार्श्वभूमीवर प्रगती विद्यामंदिर शाळेचे शिक्षक मनोज भालेराव यांनी ‘शाळा बंद पण शिक्षण सुरु’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्यचा विकास व्हावा व त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवून चित्र काढून रंगविणे स्पर्धेचे आयोजन केले.
स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गणरायाची अतिशय सुंदर चित्रे काढून छान रंगविली. या उपक्रमाला ऑनलाईन माध्यमाने विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंदजी ओसवाल यांनी उदबोधन केले. संस्थेच्या अध्यक्षा यांनी गणपती बाप्पा मोरया असा जय घोष करत. गणेशोत्सवाचे महत्व सांगितले. संस्थेचे सचिव सचिन दुनाखे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी प्रगती विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा फेगडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.