जळगांव, प्रतिनिधी । येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविदयालयातील स्कूल ऑफ डिझाईन अॅण्ड विभाग प्रमुख प्रा. राज मारूती गुंगे यांना कर्तव्यदक्ष, उपक्रमशिल व सामाजिक विकासशील शिक्षक म्हणुन ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकार्ड -कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्यावतीने राष्ट्रीय ‘ ग्लोबल गोल्ड आयडियल टिचर २०२१’ पुरस्काराने सन्मानित केले.
५ सप्टेबर शिक्षक दिनाचे औचित्य साधुन हा पुरस्कार सोहळा हॉटेल ३ स्टार, खारघर, नवी मुंबई येथे मोठया दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मा. बाळाराम पाटील : महाराष्ट्र विधान परिषद सदस्य – शिक्षक आमदार कोकण शिक्षण मतदार संघ, डॉ. एस. एन. माळी : मा. संचालक पुणे शिक्षण विभाग व अनुपमा खानविलकर-शिताळे : वरीष्ट पत्रकार व वृत्त निवेदीका – झी मिडीया कॉरपोरेशन लिमीटेड. संस्था अध्यक्ष- मेघा महाजन, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होत.
कला शिक्षण, कला सेवा आणि कला अध्यापक ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत त्यांनी चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकार, चित्रपट कला दिग्दर्शन, नाटयनिर्मीती, नाटयसंहिता लेखन, सामाजिक प्रबोधन, विदयार्थ्यांसाठी कौशल्यधिष्ठीत उपक्रम आजतायत राबवत आहेत. ज्यामध्ये सामजिक प्रबोधनपर पथनाट्ये, कला शिबीर, मुर्तीकला शिबीर, चित्रकला आयोजन, १५ वर्ष निरंतन कला सेवा, १२ वर्ष नाटयसेवा व १२ वर्ष कला अध्यापक ही जबाबदारी निस्वार्थीपणे समाजभान राखत पार पाडली आहे. त्यांना कालीदास अकादमी उज्जैन मध्यप्रदेश येथे शिल्पकलेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कर्तव्यदक्ष व कौशल्यनिपूण कलाशिक्षक या गुणांमूळे संपूर्ण भारतभरातुन आलेल्या प्रस्तावातुन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.