जळगाव, प्रतिनिधी । प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी महत्वाचा असणारा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाच वातावरण पसरलं आहे. प्रत्येक घराघरामध्ये गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असून अनेक महिला या काळामध्ये होणाऱ्या हरितालिकेच्या व्रताचीही तयारी करताना दिसत आहेत. हरितालिकेचं हे व्रत आपल्या पतीसाठी केलं जात असल्यामुळे या व्रताचं महत्व अनन्यसाधारण आहे. पती आणि पत्नीच्या नात्यातील ऋणानुबंध अधिक दृढ करण्याच्या या उत्सवानिमित्त नवजीवन प्लसतर्फे भगिनींकरिता मोफत मेहंदीची भेट देण्यात येणार आहे.
हरितालिका हे व्रत भाद्रपद शुल्क तृतीयेला केले जाते. भगवान शंकर आपल्याला पती रुपाने मिळावा यासाठी पार्वती देवीने हे व्रत केलं होतं. तेव्हापासून हे व्रत कुमारिकेपासून लग्न झालेल्या महिलांपर्यंत केलं जातं. विशेष म्हणजे हे व्रत दरवर्षी न चुकता केलं जातं. सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करताना दिसतात. या व्रताचे महत्व अधिक वृध्दिंगत होण्याकरिता उद्या (दि.९) हरितालिकेनिमित्त नवजीवन प्लसच्या बहिणाबाई चौक व महाबळ स्टोअर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक महिला ग्राहकाला हातावर मोफत मेहंदी काढून देण्यात येणार आहे.
नवजीवन प्लसच्या बहिणाबाई चौक व महाबळ स्टोअर्समध्ये येऊन या खास अभिनव भेटीचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरिया यांनी केले आहे.