संगमनेर, प्रतिनिधी | राज्यातील नव्याने 20 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शिक्षकांना शालार्थ आयडी देऊन सप्टेंबर 2021 चे वेतन ऑनलाईन प्रमाणे काढणे याच बरोबर पायाभूत वाढीव पदांचे प्रस्ताव व अनुकंपा बाबतचे प्रलंबित प्रश्नांसह विविध प्रश्नांबाबत नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पुढाकारातून मंत्रालयात शिक्षण मंत्र्यांचे झालेल्या बैठकीतून सर्व प्रश्न लवकर मार्गी लागणार आहेत..
मुंबई मंत्रालय येथे शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत प्रत्यक्ष ऑनलाइन बैठक संपन्न झाली. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे ,आमदार बाळाराम पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार जयंत आजगावकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार किरण सरनाईक, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण उपसचिव काझी, शिक्षण संचालक दिनकर जगताप तसेच शिक्षण विभागातील संबंधित अधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..
यावेळी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 10: 20 :30 च्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे मंजूर करून घेण्यासाठी लवकरच वित्तमंत्री यांच्याकडे बैठक, तसेच राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी जी दिरंगाई होते आहे. त्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात येईल, याच बरोबर राज्यातील वाढीव पदांचे प्रस्ताव दोन तीन दिवसात शासनाकडे पाठवले जातील तसेच नव्याने 20 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शिक्षकांना शालार्थ आयडी देऊन सप्टेंबर 2021 चे पेमेंट ऑनलाईन काढणे बाबत नामदार वर्षाताई गायकवाड यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या आहेत. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा केला असून त्यांच्या मागणीनुसार राज्यातील केंद्र शासन पुरस्कृत आयसीटी शिक्षकांना मानधन वर सेवेत सामावून घेण्याबाबत ये लवकर केंद्राकडे प्रस्ताव करण्यात येईल असेही शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले आहे
यावेळी बोलताना आ डॉ. सुधीर तांबे म्हणाले की ,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महा विकास आघाडी सरकारने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत अत्यंत सकारात्मक पाऊल घेतले आहे. अनुकंप प्रश्न, पायाभूत पदे बाबतचा निर्णय ,शिक्षकांना शालार्थ आयडी देणे ,प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अघोषित वर्ग, तुकड्या शाळांचे प्रस्ताव सप्टेंबर 2021 पर्यंत शासन कडे पाठवणे असे विविध प्रश्न मार्गी लागली आहेत. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. या विभागाकडे महाविकास आघाडी सरकार अत्यंत सकारात्मक पाहत असून उर्वरित प्रश्न लवकर मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .
आमदार डॉ. तांबे यांच्या पाठपुरावाने सातत्याने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न मार्गी लागले जात असल्याने राज्यभरासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव ,नंदुरबार मधील शिक्षक संघटना, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांसह विविध विभागातून आमदार डॉ. तांबे यांचे अभिनंदन होत आहे