Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पायी जाणाऱ्या शिक्षकाला अज्ञातांनी मारहाण करून मोबाईल केला लंपास

by Divya Jalgaon Team
September 8, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात चार तरूणांनी किरकोळ कारणावरून एकाला केली बेदम

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील प्रेम नगरातील शिक्षकाला मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल अज्ञातांनी हिसकावून दुचाकीने फरार झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विवेकानंद नगरात पायी जाणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून त्यांच्या हातातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन जणांनी जबरी हिसकावून दुचाकीने फरार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सुर्यभान झाल्टे (वय-३३) रा. प्रेम नगर जळगाव हे शिक्षक आहेत. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता ते हरीविठ्ठल नगरमधील विवेकांनद नगरातील विवेकानंद बगीचा येथून शाळेचे सहकारी एम.एस. सुरवाडे यांच्याकडे शाळेच्या कामकाजासाठी आले होते. कामकाज आटोपून घरी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान घरी पायी जात असतांना अज्ञात तीन जण दुचाकीवर त्यांच्या समोर आले. तिघांनी शिक्षक प्रशांत झाल्टे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेला. याप्रकरणी शिक्षक प्रशांत झाल्टे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.

Share post
Previous Post

आजचे राशीभविष्य, बुधवार, ८ सप्टेंबर २०२१

Next Post

आ. डॉ. तांबे यांच्या पुढाकारातून शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण मंत्र्यांसमवेत बैठक

Next Post
आ. डॉ. तांबे यांच्या पुढाकारातून शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण मंत्र्यांसमवेत बैठक

आ. डॉ. तांबे यांच्या पुढाकारातून शिक्षणक्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण मंत्र्यांसमवेत बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group