चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या तरी पाऊस कमी झाला आहे. मात्र नदीतील पाण्याची पातळी वाढली असून सावधानता म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असल्याची माहिती चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहेत. चितेगाव आणि उंबर ओहळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. तितुर व डोंगरी या दोन्ही नद्यांना पाणी पातळी वाढत आहे. वाढत्या पाणी पातळी मुळे सावधानता म्हणून नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात येत आहे.