भुसावळ – शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुसावळ तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या असंख्य महिलांनी मुक्ताईनगर येथे नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रसंगी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद च्या जोरदार घोषणा महिलांनी दिल्या.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटिल यांचे आदेशानव्ये तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमुख उषाताई मराठे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महिला आघाडी तालुका संघटिका भूराताई रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वात भुसावळ तालुक्यातील शिवसेना पक्ष वाढीकरिता संघटन वाढवून पक्ष बळकटी करीता महिलांची फौज उभी करण्यात आली आहे.
महिलांचा मान सन्मान वाढून महिलांवरिल अत्याचार व अन्याय रोख़ून त्यांचे पाठीशी उभे राहावे यांउद्देशाने तसेच ८०टक्के समाजकारण व २० राजकारण या धोरणा नुसार विश्वास ठेवून तमाम कॉंग्रेस मधील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात छायाताई बोंडे, रेहान बी शेख यासीन, नफिना गफफार खान, नजमा मुशीर , तायर इरफान , नूरबजा रईस , फर्जना नबाब , रजिया शे गफफार, सजेदा बी परबेज, कमल खान, रुकसाना हुसेन खान, सईदा बी निजाम , मुवारफ सैरयद रियास्त, अफसना नजीर ,कमरू ननिसा , रजिया बी , शाहीन बी ,मालती शिंदे, अनीता बाविस्कर , शोभाबाई कचरे, गीताबाई शिरसाठ सुनीता सावळे . शारदा पवार, रेखा पवार , अनिता राखवडे, सुमन खुराडे , आशा जाधव, ज्योती राखवडे , संविता पाटील यांचेसह असंख्य महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.यात बहुतांशी मुस्लिम समाज भगिनी यांचा समावेश आहे.
यावेळी महिला आघाडीच्या पूनम बऱ्हाटे, रोहिणीताई पाटील, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सुषमा शिरसाट, रजनीताई चौधरी, शोभा कोळी तालुका समन्वयक सुनीता तळले ,उपतालुका संघटिका उज्वला सोनवणे, शहर संघटिका सरिताताई कोळी, शारदा भोई उपशहर प्रमुख भावना गायकवाड भारती गोसावी, अनिता पवार, लक्ष्मी खरे, रंजना गोसावी, हिराताई पाटील, पुष्पा खरे , सुंनदा विरगट, पूजा गिरणारे , मंगल ठाकूर, ज्योती मराठे , सोजा भोई, शोभा कनोजे , सदनां तडवी , शुभांगी सावकारे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्त्यां उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न करण्यात आला.